शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (08:22 IST)

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण एकाला कोठडी अन्य रिमांडहोम मध्ये

नाशिक अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आज संशयित आरोपीना कोर्टात हजर केले होते. आज कोर्टाने पोलिसांचे मत एकूण घेतले आणि त्यातील एका सज्ञान आरोपीला ९ डिसेंबरपर्यंत चार दिवसांची  पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर अल्पवयीन असलेल्या सर्व  ५  मुलांची रिमांड होममध्ये रवानगी  केली आहे.
 
या प्रकरणातील मास्टर माइंड असलेला एकमेव आरोपी जो सज्ञान असून त्याचे नाव किसन जयप्रकाश जागर असे आहे. हा याच शाळेतील माजी विद्यार्थी असून त्याचे वय २१ आहे. हा सिडको येथील अश्विन नगर येथील संभाजी स्टेडियम जवळील अक्षय अपार्टमेंट येथील रहिवासी आहे
 
नवीन नाशिकमधील इंग्रजी माध्यमांच्या उच्चभ्रू शाळेत शिकणाऱ्या आठवीतील मुलीवर तिच्याच शाळेतील दहावीतील ६ मुलांनी सामुहिक बलात्कार केल्याच्या घटनेनंतर संशयितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आ. सीमा हिरे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. आ. हिरे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी अंबड पोलिस स्टेशनला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.