testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नाशिक ते शेगाव सायकल रॅली

cycle
नाशिक सायकलीस्ट मेंबर आणि जल्लोष ट्रेकिंग ग्रुपतर्फे आयोजित नाशिक ते शेगाव सायकल रॅलीस शुक्रवारपासून सुरु झाली. सकाळी साडेसहा वाजता नाशिकच्या सायकलपटूंनी शेगावकडे निघाले. जल्लोष ट्रेकिग ग्रुप व नाशिक सायक्लिस्टचे मेंबर यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन नाशिक ते शेगावकडे रवाना झाले आहेत. त्यांचा पहिला मुक्काम नाशिकपासून १६० किमीवर असणाऱ्या धुळे येथे होईल.

सायकल रॅलीचा दुसरा मुक्काम मलकापूर येथे असून 6 तारखेला मलकापुर -खामगाव -शेगाव असा 63 किमीचा प्रवास सायकलीस्ट करून आपल्या निर्धारित वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर शेगाव येथे सकाळी ११ वाजेच्या सुमारास श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन वाहनाने नाशिककडे रवाना होतील.

या रॅलीत संदीप काकड, डॉ नितिन रौंदळ, डॉ संजय रकिबे, डॉ मृत्युंजय जाधव, डॉ जयराम ढिकले, डॉ तुषार बस्ते, मनोज शिंदे, संदीप वर्मा, शिवाजी लोंढे, रत्नाकर भामरे, विक्रम खैरनार, गजानन कदम, संदीप ढोक यांनी सहभाग घेतला आहे.


यावर अधिक वाचा :