शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2017 (09:19 IST)

गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय केल ? ठोस उपाययोजना लिहून द्या

दहीहंडी उत्सवात मानवी मनोऱ्यांच्या निर्बंधांसंबधातील पुढील सुनावणी 2 ऑगस्टला होणार आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय ठोस उपाययोजना केलेल्या आहेत, त्याचं लेखी स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून मागविले आहे. दहीहंडी उत्सवात 20 फुटांच्या वरती मनोरा लावता येणार नाही, 18 वर्षांखालील गोविंदांना मनोऱ्यात सहभाग घेता येणार नाही, असे निर्बंध सुप्रीम कोर्टाने घातलेले आहेत. त्याविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राज्य सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. राज्य सरकारने गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय ठोस उपाययोजना केल्या आहेत, त्याचा लेखी अहवाल सादर करा, त्यानंतर कोर्ट निर्णय घेईल, असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले