Widgets Magazine
Widgets Magazine

शेतकऱ्याशी संवादासाठी उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना

शुक्रवार, 9 जून 2017 (22:24 IST)

शेतकरी संपाची  दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना केली असून हा गट राज्यातील शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांशी पाठीशी राहील. शेतकरी संकटात आहे, याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळे कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील या मंत्रिगटात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष महाजन आणि शिवसेनेचे दिवाकर रावते (परिवहनमंत्री) यांचा समावेश आहे. हा गट राज्यातील विविध शेतकरी संघटनांशी सर्व मागण्या, सूचना यावर चर्चा करेल. आणि त्यांचा अहवाल सादर करेल. कोणताही प्रश्न संवादानेच सुटू शकतो, असा आपला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पुणे कचरा प्रश्न ,आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

पालिका आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या ...

news

आता नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटला बंदी नाही

मुंबई हायकोर्टाने क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी उठवली आहे. नवी मुंबईतील क्लस्टर ...

news

तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप

उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केला आहे. ...

news

UK Election: पंतप्रधान थेरेसांना झटका

ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात आहे. मतमोजणीत पंतप्रधान पंतप्रधान ...

Widgets Magazine