testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भोसरी भूखंड प्रकरणी खडसेयांच्यावर गुन्हा दाखल

eaknath khadse
Last Modified मंगळवार, 11 एप्रिल 2017 (12:13 IST)
पुण्यातील भोसरीतील औद्योगिक क्षेत्रातील भूखंड कमी किमतीत मिळवण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 13 (1) ड, (2), 15 आणि भादंवि 109 प्रमाणे एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी, जावई, जागा मालक उकाणी आणि इतर अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची चौकशी अप्पर पोलीस महासंचालकाच्या देखरेखीखाली करा, असे आदेश 8 मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणातील तक्रारदार हेमंत गावंडे यांनी 30 मे 2016 रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जालाच फिर्याद समजावी आणि प्रकरणाचा तपास करावा, असा आदेश आहे.


यावर अधिक वाचा :