गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सर्वात लठ्ठ महिलेने घटवले 142 किलो वजन

गेल्या पाच आठवड्यात जगातील सर्वात ‘वजनदार’ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमानचे वजन 142 किलोने घटवले आहे. सुमारे 25 वर्षे घराबाहेर पडू न शकलेल्या 418 किलो वजनाच्या इमानवर मुंबईत शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आले आहे. तिच्यावर सध्या सैफी रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्यावर बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया केली जात आहे. तत्पूर्वी, तिच्यावर सुरू असलेल्या औषधोपचारामुळे अवघ्या पाच आठवड्यात तिच्या वजनात खूपच फरक पडला आहे.
7 मार्च रोजी वजन कमी करण्यासाठी इमान अहमदवर बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण या शस्त्रक्रियेपूर्वीत तिने डाएट आणि औषधोपचारामुळे अवघ्या महिनाभरातच 100 किलो वजन घटवले होते. आता पुन्हा डाएट आणि औषोधोपचाराद्वारे एकूण 142 किलो वजन घटवण्यात आले आहे. भारतात उपचारार्थ दाखल केले तेव्हा इमानचे वजन तब्बल 500 किलो होते. पण डॉक्टर मुफ्फजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली तिने तब्बल 142 किलो वजन घटविले आहे. इमानवरील पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर ती इजिप्तला परतणार आहे. इजिप्तला गेल्यानंतरही तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.