गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (09:48 IST)

मनपासाठी 56 तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 69 टक्के मतदान

देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी आज झालेल्या निवडणुकीत विक्रमी 55 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मुंबईसह राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी वर्तविला आहे. 
 
राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवारी राज्यात सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील 4 पंचायत समित्या आणि त्याअंतर्गतच्या निवडणूक विभागात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. यवतमाळ जिल्हा परिषदेचे 6 निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या 12 निर्वाचक गणांत 73 टक्के; तर वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 निवडणूक विभागात व पंचायत समितीच्या 4 निर्वाचक गणांत 68.99 टक्के मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. महानगरपालिकेच्या मागील निवडणुकांत सरासरी 52 टक्के; तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत सरासरी 68.99 टक्के मतदान झाले होते.