शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (09:42 IST)

चाळीस तृतीयपंथीयांनी केले मतदान

सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली तृतीय पंथीय वर्गाल मतदानाचा हक्क देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना आपल्या समस्या मांडण्याची दिशा मिळाली आहे. तर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केले होते. तर आता  राज्यात होत असलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये यंदाच्या वर्षी तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींनी मतदान करत आहेत. 
 
यामध्ये पुण्यातील बुधवार पेठ भागातील आशीर्वाद संस्थेच्या माध्यमातून रजिस्टर करण्यात आलेल्या ४० व्यक्तीनीझालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले आहे.त्यामुळे आवाज नसलेल्या समाजाला एक नवी ओळख मिळणार आहे.