testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुणे : माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन

chanchala kodre
Last Modified सोमवार, 18 डिसेंबर 2017 (16:05 IST)

पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे (४२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने

सोमवारी
दुपारी निधन झाले.
विद्यमान नगरसेवक असलेल्या कोद्रे यांना छातीत दुखू लागल्याने
रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळीपासून उपचारांना चांगला प्रतिसाद देत होत्या. मात्र अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांचे निधन झाले.

मुंढवा - हडपसर या प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर कोद्रे दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या. पहिल्याच वेळी निवडून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदावर काम करण्याची संधी दिली. सतत हसतमुख आणि सभागृहात नेहमी बोलण्यासाठी त्या पुढाकार घेत असत.
महिला नगरसेवकांचे चांगले संघटन त्यांनी केले होते. खराडी येथील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.



यावर अधिक वाचा :