शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2017 (14:10 IST)

सरकारने मागविली थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील 1 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली आहे. यासंदर्भात जिल्हा बँकांना पत्र लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या दृष्टीनं सरकारनं एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसतंय.  राज्यातील शेतकऱ्यांकडे 30 हजार कोटींची थकबाकी आहे. यातील 75% म्हणजे 20 ते 21 हजार कोटींची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे केवळ 1 हजार ते 2 हजार कोटींची, तर उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 15 टक्के थकबाकी आहे.