गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शेतकर्‍यांसाठी पणन मंडळाकडून टोल फ्री नंबर

शेतकर्‍याला माल द्यायचा असेल, अडचणी येत असतील तर त्यांनी पणन मंडळाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यासाठी पणन मंडळाकडून 18002330244 हा टोल फ्री नंबर तयार करण्यात आला आहे. शेतकरी त्याच्यावर संपर्क साधू शकतात. शेतकऱ्याला शेतमाल द्यायचा असेल, काही अडचणी येत असतील तर ते संपर्क करू शकतील, असं सदाभाऊ खोत म्हणाले.“शेतकरी संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा गोंधळ आणि दंगा घालण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. 
 
शेतकरी संपामुळे नाशिक, पुण्यात भाजीपाला आवक घटली आहे, मात्र मुंबईत काही परिणाम नाही, असं  सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. भाजीपाला आणि दुधाव्यतिरिक्त इतर माल अडवून नासधूस होतेय. हे करणारे शेतकरी नाहीत. यात शेतकऱ्यांच्या आड काही मंडळी घुसली आहेत. ज्यांना 15 वर्ष काही करता आलं नाही ते संप चिघळवत आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.