गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शेतकरी संप : येवला 18 जणांवर गुन्हे दाखल

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी येवल्यात 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालखेड मिरचिचे ता.निफाड येथे आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, माधव भंडारी आणि रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळयाची अंत्ययात्रा काढन्यात आली. शेतकरी संपाच्या दुस-या दिवशी धुळगाव येथे मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. शेतकरी संघटना नेते संतु पा झांबरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचे आदोलन दुस-या दिवशीही कायम सुरू आहे. नांदूर शिंगोटे( सिन्नर) येथे बायपास जवळ नारळ,आंबे,टोमॅटो घेवून जात असतांना तीन मालट्रक शेतकऱ्यांनी पकडले. 
 
येवला कोपरगाव रस्त्यावरील पिंपळगाव-जलाल येथील टोल नाका येथे झालेल्या शेतकरी संपात वाहने अडवून नुकसान केल्याप्रकरणी 40 ते 45 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले  आहे. त्यातील 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.