शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जुलै 2018 (16:03 IST)

जियो इन्स्टिट्यूट शोधा : शोधून दिले तर मनसे विद्यार्थीसेने तर्फे 11लाख पैशांचे बक्षीस

स्थापना होण्याआधीच केंद्र सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स मध्ये निवड झालेल्या जियो इन्स्टिट्यूट शोधून देणाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने 11लाख पैशांचे अर्थात 11 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. याची घोषणा करणारे पोस्ट आणि पोस्टर सध्या सोशल मिडियावर जोरदार फिरत असू, मनसे ने सरकारची जोरदार खिल्ली उडवली आहे.
 
जागतिक दर्जाच्या 100 विद्यापीठांमध्ये भारताच्या एकाही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेचा समावेश नाही. त्यामुळे भारतातील नावजलेल्या सरकारी व खासगी विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांची निवड करुन त्यांना केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो.
 
भारतभरातून विद्यापीठ तसेच शैक्षणिक संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांना इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्सचा दर्जा देण्यात येणार होता. यात आता प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या परंतु कागदावर असलेल्या जिओ या खासगी शैक्षणिक संस्थेचा समावेश करण्यात आला आहे. यावर आता विविध क्षेत्रातून टीका होत असून मनविसेने तर चक्क जिओ विद्यापीठ शोधणाऱ्याला अकरा हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.