testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली!

मुंबई| Last Modified मंगळवार, 25 जुलै 2017 (13:35 IST)
मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली आहे. दामोदर पार्क येथे श्रेयस सिनेमागृहाजवळची साई दर्शन ही चार मजली इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या इमारतीत 15 खोल्या होत्या तसेच इमारतीच्या तळमजल्यावर सितप नर्सिंग होम हे रुग्णालय होते. सुरुवातीला 8 ते 10
जण ढिगा-याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण ताज्या माहितीनुसार ढिगा-याखाली 35 ते 40 जण अडकले असण्याची शक्यता आहे.

इमारतीच्या तळमजल्यावर सितप नर्सिंग होम हे रुग्णालय होते. तिथे काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत नऊ जणांना ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले असून, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस, पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.


यावर अधिक वाचा :