शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2017 (17:32 IST)

गारपीटीने नुकसान झालेल्या शेतीचे 24 तासात पंचनामे करा

राज्यभरात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर सकाळीच सदाभाऊ खोत शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. यावेळी  अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं नुकसान झालेल्या शेतीचे 24 तासाच्या आत पंचनामे करा असा आदेश त्यांनी दिला. पंढरपूर तालुक्यातील सरकवली, ओझेवाडी या गावांची सदाभाऊंनी पाहणी केली. अवकाळी पावसात जीव गमावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच घरांची पडझड झाल्यास त्याचीही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.सोलापूर जिल्ह्यासह लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड परिसराला अवकाळीने झोडपलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिल्यानंतर राज्यमंत्री सदाभाऊ खोत पहाटेच पंढरपुरात दाखल झाले.  अर्ध्या तासांच्या गारपीटीमुळे द्राक्षे आणि डाळिंबाचे अतोनात नुकसान झालं आहे.