Widgets Magazine
Widgets Magazine

गोव्यातही धरणे ८० टक्क्यांवर…

पणजी-, सोमवार, 24 जुलै 2017 (08:27 IST)

goa

राज्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बहुतेक सर्व महत्त्वाच्या  धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ती ८० टक्के भरली आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत धरणे ओसंडून वाहू लागतील,  अशी माहिती जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
धरणांच्या पातळीत वाढ झाल्याने तसेच पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे सिंचनात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाना आवश्यक ते सहकार्य  देण्यास जलस्रोत खाते नेहमीच तत्पर राहील,  असेही पत्रकात म्हटले आहे.
 
आकडेवारीनुसार राज्यातील साळावली,  अंजुणे,  आमठणे, चापोली व पंचवाडी या पाच महत्त्वाच्या धरणांमधील पाण्याच्या पातळीत मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे वाढ झाली आहे. या धरणांच्या पाण्याची पातळी वाढून ती 80 टक्क्यांहून अधिक झाली आहे. साळावली धरणाची क्षमता 41.15 मीटर इतकी असून 21 जुलै रोजी 40.24  मीटर  पर्यंत धरण भरल्याची नोंद  झाली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी साळावली धरणाची ही पातळी 40.57 मीटर इतकी नोंद झाली होती.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

इंग्लंडमध्ये ही भारतीय महिला आहे जेलर

इंग्लंडमधील रिसले इथल्या पुरुष कारागृहावर भारतीय वंशाच्या पिया सिन्हा जेलर म्हणून काम ...

news

एनडीएच्या एका छात्राची गळफास घेऊन आत्महत्या

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)तील एका छात्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ...

news

पाकिस्तानला अमेरिकेची आर्थिक मदत बंद

अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी ३५ कोटी डॉलरची मदत न देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

news

भुशी धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी

लोणावळा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे भुशी धरणाचा परिसर, सहाराकडे जाणारा रस्ता व ...

Widgets Magazine