testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरण, आरोपींची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

govind pansare
Last Modified बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (17:15 IST)

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. फरारी आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 लाखांचं बक्षीस सरकारच्या वतीने देण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली. मात्र, पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागला नाही. या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्याची जामिनावर मुक्तता झाल्याने पोलिसांच्या हाती सध्या पुरावा आणि आरोपी नाहीत.

या प्रकरणातील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर हे दोन वर्षांपासून फरार आहेत. या दोन आरोपींची माहिती देण्यासाठी पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे. या दोघांची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे- 020-25634459, अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर- 0231-2656173, तसेच पोलीस उपनिरीक्षक रमेश ढाणे (SIT टीम) – 9823502777 या क्रमांकावर देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.यावर अधिक वाचा :