Widgets Magazine
Widgets Magazine

न्यायालयाने गोविंदाची केस बंद केली

गुरूवार, 13 जुलै 2017 (14:24 IST)

suprim court

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंदा 9 वर्षांनी चाहत्याची बिनशर्त माफी मागण्यास तयार झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

16 जानेवारी 2008 रोजी गोविंदाने संतोष रायला कानाखाली लागवली होती. घटनेच्या तब्बल नऊ वर्षांनंतर गोविंदाने सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. त्याचप्रमाणे संतोषला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला मंजुरी दिली असून केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना दोन आठवड्यांत समेट घडवण्याचा सल्ला दिला होता. 

तू हिरो आहेस, तू कोणाला कानशिलात कशी लगावू शकतोस? असे न्यायालयाने गोविंदाला विचारले होते. तुझे चित्रपट आम्ही एन्जॉय करतो. मात्र तू कोणाला मारावेस, हे आम्ही सहन करु शकत नाही. रील लाईफ आणि रियल लाईफ यातला भेद तू समजून घ्यायला हवास. मोठा हिरो आहेस, मन पण मोठं कर. सामान्य माणसाला चपराक लगावणं तुला शोभत नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पेट्रोल पंपांवरील इंधन घोटाळा : मुख्य सूत्रधाराला अटक

पेट्रोल पंपांवरील इंधन घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार प्रशांत नूलकरला ठाणे पोलिसांनी मंगळवारी ...

news

संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होणार

येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होईल, असं हवामान खात्याने म्हटलं ...

news

टोल बंद करण्यास आम्ही असमर्थ ,सरकारची कबुली

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा टोल बंद करण्यात आम्ही असमर्थ आहोत, अशी स्पष्ट कबुली राज्य ...

news

सौदीच्या नाजरन शहरात ; भारतीयांसह ११ विदेशी कामगार ठार

खिडकी नसलेल्या घराला लागलेल्या भीषण आगीत भारतीयांसह ११ विदेशी कामगार ठार झाले असून, अन्य ...

Widgets Magazine