शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गुढीपाडवा: फुलांची खरेदीसाठी दादरमध्ये गर्दी

महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी दोन दिवस गुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे. २८ मार्च रोजी फाल्गुन अमावस्या सकाळी ८ वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे. त्यानंतर ‘अमा समारती’चे स्नान करूनच घरच्या देवांचे पूजन आणि गुढी (ब्रम्हध्वज) पूजन करण्यात येतील तसेच हा दिवस क्षय तिथी असल्यामुळे शुभकार्याला वर्ज्यच आहे. 
मात्र, सूर्य सिद्धांत पंचांग मानणा-या दक्षिण-उत्तर भारतात सर्वत्र चैत्र शुद्ध प्रतिपदेचा वर्षारंभ, रामनवरात्रारंभ हे चैत्राचे वसंतोत्सव दि. २९ मार्च रोजी होणार आहेत, त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा दोन दिवस असणार आहे. या दरम्यान सण साजरा करण्याच्या उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत असून मुंबईच्या दादर येथे नव वर्षांचे स्वागत करण्यासाठी फुलांची खरेदी करणार्‍या भाविकांची अफाट गर्दी दिसून आली.