Widgets Magazine
Widgets Magazine

विशाखा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे मुक्त विद्यापीठाचे आवाहन

मंगळवार, 7 मार्च 2017 (14:56 IST)

gyan ganga

नवोदित कविंना प्रोत्साहन देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे कविवर्य यांच्या गौरवार्थ, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाच्या नावाने ‘विशाखा काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. सन २०१७ च्या या पुरस्कारासाठी कविंनी आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी पुरस्कारांची निवड केली जाईल. रु.२१,०००/-, रु.१५,०००/- व रु. १०,०००/- (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय) सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी नवोदित कवी किंवा त्यांच्या प्रकाशकांनी १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या काळात प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाच्या पाच प्रती दि. १७ एप्रिल २०१७ पूर्वी डॉ. विजया पाटील, समन्वयक, कुसुमाग्रज अध्यासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक – ४२२ २२२ या पत्यावर पाठवाव्यात असे आवाहन मुक्त विद्यापीठाने केले आहे.  पुरस्कारासाठी पाठविण्यात येणारा काव्यसंग्रह हा संबंधित कवीचा पहिलाच प्रकाशित काव्यसंग्रह असावा आणि हा आपला पहिलाच प्रकाशित काव्यसंग्रह असल्याचे प्रतिज्ञापत्र काव्यसंग्रहाबरोबर पाठविणे बंधनकारक आहे. पुरस्कारासाठी पाठविण्यात आलेले काव्यसंग्रह परत पाठविण्यात येणार नाहीत. हस्तलिखित किंवा कात्रणे पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी ०२५३-२२३०१२७ किंवा ९४२२२४७२९१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा किंवा http://ycmou.digitaluniversity.ac अथवा http://ycmou.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

केजरीवालांची शुगर वाढली, आता केवळ फलाहार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. राजकारणाव्यतिरिक्त ...

महिला नौसैनिकांच्या न्यूड फोटोंमुळे खळबळ

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत सायबर क्राइमचे प्रमाणही झपाट्याने वाढत ...

news

एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात

बँकॉकमध्ये मेदांता हॉस्पिटलच्या एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात झाला आहे. पाच जण एअर ...

news

साई शिर्डी आता रात्री पूर्ण बंद

संपूर्ण जगात आणि देशात शिर्डी साई बाबा प्रसिद्ध आहेत. एक गुरु म्हणून अनेक नागरिक शिर्डी ...

Widgets Magazine