गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मे 2017 (15:24 IST)

मुक्त विद्यापीठात ‘पाणी व्यवस्थापनावर’ राष्ट्रीय कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विद्याशाखेच्या वतीने दि. २७ मे २०१७ रोजी “पाणी समस्या-व्यवस्थापन व भविष्यातील आव्हाने” या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

विद्यापीठातील शैक्षणिक सभागृहात होणारी ही कार्यशाळा शनिवारी सकाळी १० ते ५  या कालावधीत होणार आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून, यात प्रामुख्याने विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, प्राचार्य, पाणी क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवक व संस्था सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाणी संवर्धन, पाणी प्रश्न व पाण्याचे शास्त्रशुध्द पध्दतीने व्यवस्थापन करण्यासंदर्भात विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेत डॉ. मोहन पाटील, प्रा. सतीश थिगळे, डॉ. उदय पाटणकर वेगवेगळ्या घटकांवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा लाभ विद्यार्थी, प्राध्यापक, स्वयंसेवक आणि जास्तीत जास्त सर्वसामान्यांनी घ्यावा असे आवाहन, राष्ट्रीय कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. जयदीप निकम व सह समन्वयक प्रा. राम ठाकर यांनी केले आहे.