testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

15 जुलैपासून कोल्हापूरसह पाच जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्तीे

Last Modified मंगळवार, 11 जुलै 2017 (16:58 IST)

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या जिल्ह्यामध्ये 15 जुलैपासून वाहनचाकाना हेल्मेट सक्तीे केली जाणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

याची पूर्वतयारी म्हणून पोलीस प्रशासनाने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाने याची संपूर्ण तयारी केली असली, तरी शहराअंतर्गत हेल्मेट शक्तीला शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे.

सध्या महामार्गावर विना हेल्मेट दुचाकीस्वार सापडला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. याचा दुसरा टप्पा म्हणून 15 जुलै पासून जिल्ह्यासह शहरातही हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.

मात्र कोल्हापूरकरांनी या हेल्मेट सक्तीचं स्वागत केलं आहे. हेल्मेट खरेदीसाठी दुकानाबरोबरच रस्त्यावर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या हेल्मेट घेण्याकडे लोकांचा कल दिसतोय. कोल्हापूर शहर आणि महामार्गावर अशा विक्रेत्यांनी हेल्मेटची दुकानं थाटली आहेत.यावर अधिक वाचा :