शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2017 (15:02 IST)

उन्हाळ्यात भयंकर काळजी घ्या

उन्हाळा  सुरु झाला असून  त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे आणि शारीरिक श्रमाची कामे करणे टाळने गरजेचे आहे.  असा सल्ला राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना दिला  आहे. उन्हाळा उष्णतेच्या लाटेचा राहणार असल्याने शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याच्या शक्यतेमुळे ही खबरदारी घेण्याच्या सूचना या विभागाने दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे.त्यामुळे नागरिकांनी सर्व तोपरी काळजी घेणे गरजेचे असून तसे न केल्यास जीवाला धोका निर्माण होवू शकतो असेही स्पष्ट केले आहे.