Widgets Magazine

नोटा छापायची शाई संपली मोठे संकट

ink
Last Modified शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (10:24 IST)
नाशिक येथे असलेल्या सिक्युरिटी प्रेस म्हणजेच देशातील ९ पैकी एक असलेल्या चलन छपाई प्रेस मध्ये मोठे संकट
निर्माण झाले आहे. एका बाजूला चलन तुटवडा भरून काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असताना नोटा छापण्याची शाई संपली आहे.यामध्ये या ठिकाणी २०, ५० आणि १०० च्या नोटा छपाई सुरु होते. यामध्ये नाशिकचे शिवसेना
खासदार हेमंत गोडसे
यांनी हा तुडवडा निर्माण झाला तेव्हा
या ठिकाणी पाहणी केली होती. तर हे प्रश्न निर्माण होणार असे सुतोवाच केले होते. मात्र दिल्लीत सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी काम सुरु केले नाही तर शिवसेना सरकारच्या विरोधात गेला त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागलाच नाही, आणि झाले ते असे की आता नोटा छापण्याची शाई संपली आहे. त्यामुळे तीन शिफ्ट मध्ये रात्र दिवस काम करत असलेल्या कामगारांवर याचा परिणाम होणार आहे.त्यामुळे अनेक कोटी रुपयांचे नोटा छपाई मागे पडणार आहे,असे तरी चित्र निर्माण झाले आहे.


यावर अधिक वाचा :