Widgets Magazine

राष्ट्रवादी आमदार आव्हाड यांचे बनावट फेसबूक अकाऊंट

jitendra awhad
Last Modified शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:38 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बनावट फेसबूक अकाऊंटवरुन मराठी अभिनेत्रीसह अनेकांना मेसेज गेला आहे. या बनावट अकाऊंटबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांशी बोलणं झालं आहे. त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून कारवाई सुरु केली आहे. शिवाय फेसबुकलाही याबाबत कळवल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“बनावट अकाऊंटवरुन नेमके काय मेसेज केले ते मला माहित नाही, पण ज्यांना मेसेज गेले, त्यांनी माझ्याशी संपर्क साधून विचारणा केली. तसंच बनावट अकाऊंट सुरु असल्याचं मला दहा दिवसांपूर्वी समजलं पण ते कधीपासून अॅक्टिव्हेट आहे याची मला कल्पना नाही,” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.यावर अधिक वाचा :