गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जून 2017 (11:37 IST)

नेवाळी विमानतळ जमिनी संपादन, शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन

मुंबईतील कल्याण जवळील नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरकार शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन सुरु आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर डावलपाडा गावाजवळ पोलिसांच्या गाड्या पेटवल्या.

यावेळी शेतकऱ्याना त्याच्याच मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगगड रस्ता रोखून धरला. शिवाय टायर जाळून मलंगगडाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद केला. इतकंच नाही तर पोलिसांवर दगडफेकही केली.ब्रिटीश काळात दुसऱ्या महायुद्धात लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या  ताब्यात आली होती. परंतु यावर्षी पुन्हा नौदलाने या जागेवर दावा करत तिथे कम्पाऊंड टाकायला सुरुवात केली आहे. याला या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. जवळपास या भागातील 7 ते 8 गावांची जमिनी ताब्यात घेतली आहे.