गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राजू शेट्टी काढणार 'किसान जागृती यात्रा'

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी किसान जागृती यात्रा संपूर्ण देशभर काढणार येणार आहे. यामध्ये सुमारे १३० शेतकरी संघटना सहभागी होत आहेत. प्रथमच संपूर्ण देशातील शेतकरी एकत्र येत आहे. या पाश्र्वभूमीवर स्वामिनाथन आयोगातील शिफारस म्हणजेच शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या दीडपट हमीभाव त्याला मिळाला पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
 
सध्या शासन जी कर्जमाफी करण्याचा दावा करत आहे. पण ती निव्वळ फसवाफसवी असून, शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न शासन करत आहे, असा आरोप करून शेट्टी म्हणाले,  जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करत आहे, त्यांनी उर्वरित कर्ज ३० जून अखेर भरल्यानंतरच त्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे. असा अध्यादेश जारी करताना त्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत कर्जफेडीसाठी आहे. अशावेळी वेळेवर कर्ज भरणारा शेतकरीसुद्धा अचानक उर्वरित कर्जाची थकबाकी भरू शकणार नाही. याचाच अर्थ शासनाला अनुदान द्यायचेच नाही, असा होतो. म्हणूनच शासन केवळ शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत धूळफेक करीत आहेत. त्यामुळे आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकत्रे असून शेतकऱ्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.