testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कोपर्डी प्रकरण: फाशी की जन्मठेप ?

shalto gang rape
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना आज
शिक्षा सुनावली जाणार आहे. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशी मिळणार की जन्मठेप याकडे आता साऱ्याचे लक्ष आहे.
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सकाळी अकरा वाजता न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होईल. यावेळी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिन्ही दोषींना कक्षात आणलं जाईल. त्यानंतर न्यायाधीश आरोपींना शिक्षा सुनावतील. त्यामुळे या तिघांना कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडेच राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात 21 नोव्हेंबर रोजी दोषी नंबर 1 जितेंद्र शिंदे आणि दोषी नंबर 3 नितीन भैलुमे यांच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला होता. तर 22 नोव्हेंबर रोजी खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाळच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला. मग विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिन्ही नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची उज्ज्वल निकम यांची मागणी केली होती. 22 नोव्हेंबरलाच शिक्षा जाहीर होण्याची शक्यता होती. परंतु 29 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी होईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.


यावर अधिक वाचा :