शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गायिका पं. मंजिरी असनारे-केळकर यांना पं. कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर

शास्त्रीय गायिका पं. मंजिरी असनारे-केळकर यांना मध्य प्रदेश सरकारचा पं. कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ८ एप्रिल रोजी देवास (मध्यप्रदेश) येथे होणार्‍या विशेष सोहळयात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

मंजिरी असनारे-केळकर यांनी कोल्हापूर विद्यापीठातून संगीताचे शिक्षण पूर्ण केले आहे. सांगलीतील सी. टी. म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. जयपूरच्या अत्राली घराण्याचे पं. एम. एस. कानेटकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहेत.

त्यांनी आतापर्यंत स्वामी गंधर्व पुरस्कार समारोह पुणे, आयटीसी संगीत समारोह कलकत्ता, पंडीत पलुस्कर समारोह दिल्ली, शंकरलाल फेस्टीव्हल दिल्ली, व्होमॅड फेस्टीव्हल अस्ट्रोलिया, न्यूझीलंड, बीबीसी प्रॉम्प फेस्टीव्हील लंडन, दरबार फेस्टीव्हल लंडन संगीत समारोह अशा विविध ठिकाणी संगीताचे कार्यक्रम केले आहे. यांची दखल विविध माध्यमांनी घेतलेली आहे. आतापर्यंत त्यांच्या तीन शास्त्रीय संगीताच्या सिडीज प्रसिद्ध झालेल्या आहेत.