शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज यांनी सुरु केलेला 'लेझर शो' अनिश्चित काळासाठी बंद

नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या बॉटेनिकल गार्डनमधील 'लेझर शो' आता अनिश्चित काळापर्यंत बंद करण्यात आला आहे. महावितरणाच्या विजेच्या उच्च दाबामुळे 'लेझर शो'साठी वापरण्यात येणारे लाईटच उडाल्याने शो बंद करण्यात आला आहे. 
 
या गार्डनमध्ये असलेल्या आणि पर्यावरणाचा संदेश देणारा हा 'लेझर शो' अनुभवण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी होत होती. अत्यंत उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आल्याने आशियातील सर्वात महागडा आणि आकर्षक 'लेझर शो' म्हणून याचा नावलौकिक होता. मात्र विजवितरण विभागाच्या अनिश्चित विजपुरवठ्यामुळे या 'लेझर शो'साठी वापरण्यात येणारे सुमारे १५०-२०० महागडे लाईट जळाले आहेत.