Widgets Magazine

वीज पडून तिघांचा मूत्यू

light strikes
Last Modified रविवार, 11 जून 2017 (10:14 IST)

नाशिक जिल्ह्यात दोन घटनांमध्ये वीज पडून तिघांचा अंत झाला आहे. यात पिता पुत्राचा समावेश आहे. पहिल्या घटनेत

सिन्नर तालुक्यातील चोंढी येथील शेतकरी रघुनाथ कोंडाजी मवाळ (४०) व मुलगा मयूर रघुनाथ मवाळ (१८) अंगावर वीज पडून जागेवर मृत्यू झाला. तर प्रशांत गंगाधर मवाळ (२६) जखमी झाले. शनिवारी दुपारी वादळ व विजांचा कडकडाट सुरु असताना घरासमोरील खळ्यात साठवलेला चारा झाकण्यासाठी तिघे जण गेले होते. जखमी प्रशांत एक वर्षांपूर्वी एनडीसीसी बँकेत वडांगळी शाखेत कामाला लागला होता.दुसऱ्या घटनेत नांदगाव तालुक्यातील कसाब खेडे शिवारात वीज पडून रामदास पोपट राठोड (३०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.यावर अधिक वाचा :