Widgets Magazine
Widgets Magazine

कोल्हापूरमध्ये सर्वात लहान पॅन कार्डधारक

pancard
कोल्हापूरमध्ये सर्वात लहान वयातील पॅन कार्डधारकाची नोंद झाली आहे. या पॅनकार्ड धारकाचं वय अवघ्या 5 दिवसाच्या मुलाचं पॅनकार्ड काढण्यात आलं आहे. नाव आहे स्वराज. कोल्हापुरातील शुक्रवार पेठेमध्ये अमोलदादा पाटील आणि त्यांचं कुटुंब राहतं. 9 जानेवारी 2017 रोजी पाटील यांच्या पत्नीनं बेळगावजवळच्या रायबागमध्ये मुलाला जन्म दिला आणि पेशानं करसल्लागार असलेल्या अमोलदादा यांनी स्वराज नावानं मुलाचं अगदी पाचव्याच दिवशी पॅनकार्ड काढलं. याआधी बिहारमधल्या एका मुलीचं पाचव्या दिवशी पॅनकार्ड काढलं होतं. अमोलदादा यांनी स्वराजचं पॅनकार्ड काढल्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरी पोस्टानं हे पॅनकार्ड आलं.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :