testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

महामेट्रोच्या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

metro
पिंपरी| Last Modified मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (09:17 IST)
भविष्याच्या दृष्टीने वाहतूक सेवेचे अद्ययावतीकरण, रहदारीच्या समस्या सोडविणे आणि पर्यावरण सुरक्षेत होणारी प्रगती यांसारख्या अनेकविध पैलूंचे प्रदर्शन 10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स व एक्‍स्पोमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतीच हैद्राबाद शहरात या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. सदर प्रदर्शनामध्ये महामेट्रोच्या स्टॉलचे कौतुक झाले असून या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
शहरी भागातील मेट्रो प्रकल्पांबरोबरच त्यांच्याशी निगडीत इतर अनेक गोष्टींबद्दल माहिती देणा-या 10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्‍स्पो आणि 17 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्सचे उद्‌घाटन यावेळी उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महामेट्रोचा स्टॉल या प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरला. भारत सरकारच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिव दुर्गा शंकर मिश्रा, तेलंगणा सरकारचे मुख्य सचिव एस. पी. सिंग, सीओडीएटीयुचे अध्यक्ष डॉमनिक बुसेरू, फ्रांसचे भारतातील राजदूत एम. अलेक्‍झांडर जिग्लर, केंद्र सरकारच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंग पुरी, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आदी यावेळी उपस्थित होते.
महामेट्रोतर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये मो बाईक, इलेक्‍ट्रिक वाहने यांबरोबर मेट्रो प्रकल्पादरम्यान पुरविण्यात येणा-या फीडर सर्व्हिसेस यांसारख्या प्रवासी सेवांची माहिती पुरविण्यात आली आहे. याशिवाय मेट्रो स्टेशन्स, नागरिकांशी साधण्यात येणारा संवाद, सोशल मिडीयाद्वारे होत असलेली जनजागृती, हरित उपकक्रम यांसारख्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन विकासाचे वैशिष्ट्‌य, नवीन कल्पनांचा प्रसार करणे, शहरी वाहतूक क्षेत्राच्या व्याप्तीचा शोध घेऊन नवनवीन पर्याय आणि त्याची कार्यप्रणाली सादर करणे आणि यातून परावर्तित होणाऱ्या सर्वोत्तम वाहतूक पर्यायाची अंमलबजावणी करणे असा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

भगवा कोणाचा आयोध्येत शिवसेना विरोधात विहिप

national news
लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने राम मंदिराच्या मुद्यावरून वातावरण तापवले जात आहे. ...

वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे ...

national news
वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी ...

महाराष्ट्र क्रांती सेना लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार

national news
आरक्षणासाठी राज्यभर भव्य मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक सुरेश पाटील ...

राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांना ...

national news
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या ...

लग्न पत्रिकेवर मोदींचे कौतूक, मोदींना मतदान करण्याचे आवाहन

national news
कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावला ...

महाराष्ट्र क्रांती सेना लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार

national news
आरक्षणासाठी राज्यभर भव्य मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक सुरेश पाटील ...

राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांना ...

national news
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या ...

लग्न पत्रिकेवर मोदींचे कौतूक, मोदींना मतदान करण्याचे आवाहन

national news
कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावला ...

मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयामध्ये बुधवारी सुनावणी

national news
मागासवर्ग आयोगानं अहवाल दिल्यानंतर आता मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयामध्ये बुधवारी ...

एसबीआयमध्ये खाते उघडण्यासाठी शाखेत जावे लागणार

national news
एसबीआयच्या योनो ('यू ओनली नीड वन)च्या अनेक सुविधा प्रभावित झाल्या आहेत. बँकेनं गेल्या ...