गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यभरात एक्झिट पोलमध्ये शिवसेना - भाजपमध्ये काँटे की टक्कर

मिनी विधानसभा निवडणूक म्हणून पाहिल्या जात असलेल्या राज्यातील १0 महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी मंगळवारी मोठय़ा उत्साहात मतदान झाले. त्यामुळे आता गुरुवारी काय निकाल लागतील, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 'अँक्सिस-इंडिया टुडे' यांच्या एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत शिवसेना-भाजपामध्ये जोरदार टक्कर होणार असून भाजपाला ८0 ते ८८ तर शिवसेनेला ८६ ते ९२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे मात्र मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील अन्य महापालिकांमध्येही भाजपा मुसंडी मारण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 
यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या मित्रपक्षांनी युती तोडून स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रचार केला होता. कोथळे काढून हातात देऊ, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, अशा प्रकारची भाषा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली. त्यामुळे या निवडणुकीत खूपच रंगत निर्माण झाली होती. विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मनसे आणि अन्य पक्ष हे केवळ आपल्या अस्तित्वासाठीच लढत आहेत, असेच एकंदर चित्र होते. एक्झिट पोलमध्येही तेच चित्र समोर आले आहे. 
 
'अँक्सिस-इंडिया टुडे' यांचा एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये शिवसेनेला ८६ ते ९२ जागा मिळतील, तर भाजपाला मागच्या वेळच्या तुलनेत तब्बल ५0 जागांहून अधिक जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपा जवळपास ८0 ते ८८ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ३0 ते ३४ जागा मिळतील, तर राष्ट्रवादी 8 पान ९ वर..एक्झिट पोलमध्ये एक्झिट पोलमध्ये केवळ ३ ते ६ आणि मनसे ५ ते ७ जागांवरच विजयी होण्याचा अंदाज आहे. या अंदाजामध्ये एमआयएम पक्षाला किती जागा मिळतील, याविषयी काहीही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.
महापालिाका  भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे 
मुंबई  80 ते 88 86 ते 92  30 ते 34  03  ते 06  05 ते  07

ठाण्यामध्येही भाजपाने शिवसेनेला टक्कर देण्याचा प्रयत्न केला असला तरी मुंबईप्रमाणे तेथे स्थिती असणार नाही. ठाण्यात भाजपाला २६ ते ३३ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना ६२ ते ७0 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ठाण्यामध्ये केवळ २ ते ६ जागा मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस मात्र २९ ते ३४ जागी विजयी होईल, असा अंदाज आहे.
महापालिाका  भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे
ठाणे  26 ते 33 62 ते 70  02 ते 06  29 ते 34  ----

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळणार असून भाजपा ९८ ते ११0 जागी विजयी होईल, तर काँग्रेसला ३५ ते ४१ जागी विजय मिळेल. शिवसेनेला नागपुरात केवळ २ ते ४ जागांवरच समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
महापालिाका  भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे
नागपूर  98 ते 110 02 ते 04  35 ते 41  --  --

पुणे महापालिकेतही भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. पुण्यात भाजपाला ७७ ते ८५ जागा मिळतील, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ६0 ते ६६ जागांवरच समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेला पुण्यात १0 ते १३ जागी, तर मनसेला ३ ते ६ जागांवरच समाधान मानावे लागेल. तसेच इतरांना १ ते ३ जागा मिळू शकतील, असा अंदाज आहे. 
महापालिाका  भाजप शिवसेना काँग्रेस/राष्ट्रवादी  मनसे  
पुणे  77 ते 85  02 ते 04  35 ते 41 ---