testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हल्ल्याच्या विरोधात सामूहिक अवकाशावर महाराष्ट्राचे रेजीडेंट डॉक्टर

doctor
मुंबई| Last Modified सोमवार, 20 मार्च 2017 (13:21 IST)
आपल्या साथी डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात मुंबई समेत महाराष्ट्राच्या बर्‍याच भागात सोमवारी सरकारी दवाखान्यातील रेजीडेंट डॉक्टरांनी सामूहिक अवकाशावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पूर्ण राज्यात रुग्णांची समस्या वाढू शकते.

सामूहिक अवकाशावर जाणारे डॉक्टरांचे म्हणणे आहे की ते अशा वातावरणात काम करू शकत जेथे त्यांच्याच जीवाला धोका असेल. यामुळे बर्‍याच दवाखान्यांमध्ये वैकल्पिक व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

मुंबईच्या केईएम दवाखान्यातील डीन डॉक्टर अविनाश सूपे यांचे म्हणणे आहे की त्यांनी रुग्णांच्या समस्यांना लक्षात ठेवून इमरजेंसी अरेंजमेंट केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे मागील काही दिवसांमध्ये धुळे, नाशिक आणि सायनच्या सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्टरांवर रुग्णांच्या कुटुंबीयांनी हल्ला केला होता. कारण कुटुंबीयांचा असा आरोप होता की रुग्णाचा उपचार योग्य पद्धतीने केला जात नाही आहे. या प्रकाराच्या हल्ल्यानंतर डॉक्टरांमध्ये बराच राग व्याप्त होता. राज्‍याच्या सरकारी दवाखान्यात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे राज्‍यातील डॉक्टर स्वत:ला फारच असुरक्षित महसूस करत आहे.

शनिवार रात्री जेव्हा सायनच्या एका दवाखान्यात त्यांच्या सहकर्मीवर जीवघेणा हल्ला झाला तेव्हा डॉक्टरांमध्ये फारच रोष निर्माण झाला. हा हल्ला काही लोकांनी त्यांच्या नातेवाइकाच्या मृत्यूनंतर केला होता. यात डॉक्टर रोहित कुमार जखमी झाला होता. त्यानंतर दवाखान्यातील प्रशासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कडक नियम करण्याचे आश्वासन दिले होते.
मुंबई हाईकोर्टाच्या एका आदेशानंतर महाराष्ट्राचे रेजीडेंट डॉक्टर संपाचे आव्हान करू शकत नाही. हेच कारण आहे की त्यांनी विरोध दर्शवण्यासाठी सामूहिक अवकाशाची निवड केली.


यावर अधिक वाचा :