Widgets Magazine
Widgets Magazine

पुढील तीन दिवसात वाढणार उन्हाचा कडाका

पुणे- पुढील दोन ते तीन दिवसात वायव्य भारतातील कमाल 2 ते 4 तर पश्चिम, मध्य व पूर्व भारतातील तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला. याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील कमाल तापमानही वाढणार असून, उन्हाचा कडाका तीव्र होणार आहे.
भीरा येथे सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. होळीनंतर महाराष्ट्रातील अनेक शहरांचा कमाल तापमानाचा पार वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले.
उन्हाच्या काहिलीने नागरिक बेजार झाले आहेत. गेल्या 24 तासात राज्यातील बहुतांशी भागात तापमानात वाढ झाली असून, पुढील तीन दिवसात यात आणखी भर पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


यावर अधिक वाचा :