testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सी लिंकवरुन उडी मारली, जिवंत सापडला

एका तरुणाने गत गुरुवारी मुंबईतील वांद्रे- वरळी सी लिंकवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा दोन तास शोध घेतला पण सापडला नाही. अखेर सात तासांनी तो जिवंत सापडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निखर साहू असे या तरुणाचे नाव आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजता साहूने वांद्रयाहून सी लिंककडे जाण्यासाठी टॅक्सी पकडली. टॅक्सीत बसलेला तरुण आधीपासूनच तणावात असल्याचे वाटत होते. त्याचे अनेकदा टॅक्सी वळवण्यासाठीही सांगितले, पण नंतर तो निर्णय बदलत होता. सी लिंकवर पोहोचल्यानंतर फोटो काढण्याच्या बहाण्याने टॅक्सी थांबवण्यास सांगितली. त्यानंतर समुद्रात उडी मारली असे टॅक्सीचालकाने सांगितले.

अचानक घडलेल्या घटनेने टॅक्सीचालक गोंधळून गेला. त्याने तत्काळ पोलसि नियंत्रण कक्षात फोन करुन घटनेची माहिती दिली. बचाव पथक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तब्बल दोन तास शोध घेतला, मात्र हाती लागला नाही. संध्याकाळी ७ वाजता दादरच्या चैत्यभूमीजवळ किर्ती महाविद्यालयाच्या मागील बाजूस किनाऱ्यावर एक तरुण निपचित पडल्याचे काही विद्यार्थ्यांनी पाहिले. त्यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. त्याचा श्वास सुरू होता. त्यांनी लगेच केईएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सिऑन रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले.


यावर अधिक वाचा :

कॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...

national news
अनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...

आता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...

national news
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...

प्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...

national news
धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...

"मला शिवाजी व्हायचंय" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर

national news
मुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...

दगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार

national news
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...

व्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन

national news
सर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...

अॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार

national news
अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...

जिओची मान्सून हंगामा ऑफर

national news
जिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...

व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु

national news
व्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...

मोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट

national news
विभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...