शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2017 (20:44 IST)

स्कायमेट म्हणते पाउस कमी तर भारतीय हवामान विभाग म्हणतय पाऊस उत्तम

महराष्ट्र आणि देशात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहिल, असा अंदाज स्कायमेट या हवामान आंतराष्ट्रीय संस्थेने वर्तवला आहे. त्यांच्या नुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या तुलनेत देशात 95 टक्के म्हणजे 887 मिलीमीटर एवढा पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे.तर दुसरीकडे भारतीय हवामान खाते या वृत्तावर दुजोरा दिला नाही तर आम्ही लवकर रिपोर्ट देवू मात्र देशात पाऊस उत्तम असे मत त्यांनी वर्तवले आहे. 
 
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थीती सामान्य असेल. तर देशात जूनमध्ये सर्वाधित 102 टक्के पाऊस पडेल, तर त्यानंतर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी  पुन्हा पाणी संकट निर्माण होणार असे चिन्ह आहेत.