testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अपघात मायलेकींचा मृत्यू बेजबादार महिला चालक अटक

Last Updated: मंगळवार, 18 एप्रिल 2017 (12:46 IST)
पुणे येथील कारचा
अपघातात
जखमी झालेल्या उपचारादरम्यान लेकीनंतर आता आईचाही मृत्यू झाला आहे. पूजा विश्वकर्मा असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. बाणेरमध्ये भरधाव कारनं
दुभाजकावरील 5 जणांना उडवल होते. त्यामुळे
यात पूजा विश्वकर्मा यांची चिमुकली ईशा विश्वकर्माचाही मृत्यू झाला. तर कार चालक आरोपी महिला सुजाता श्रॉफ
हिला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या पाच जणांना बेजाबदार चालक सुजाता जयप्रकाश या महिलेन उडवलं होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीनं त्यांना धडक दिली.
या दुर्घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. तर तिची आई पूजा विश्वकर्मा गंभीर जखमी होत्या. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुजाता एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे.
पोलिसांनी सुजाता श्रॉफ
हिला अटक केली आहे. काही कारण नसताना दोघांचा जोव घेतलेल्या या महिलेला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होवू लागली आहे. शिस्त पाळून सुद्धा या दोघांचा जीव गेला त्यामुळे नागरिकांना या महिला चालकावर राग आहे. तर पोलिसांनी मुद्दामून या महिलेला उशिरा अटक केली असेही नागरिक आरोप करत आहेत.


यावर अधिक वाचा :