बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मराठी माणसा मुंबई हिंदी होतेय घसरतोय मराठी भाषिक टक्का

असंख्य बेटांपासून बनलेल्या मुंबई शहराला शेकडो वर्षांचा इतिहास असून, बॉम्बे ते मुंबई नामकरण, त्याला असलेला मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी राज्याची राजधानी ही मुंबईची ओळख आहे. मात्र  आता हि ओळख  हळूहळू पुसट होत चालली असे चित्र दिसू लागले  आहे. याच मराठी माणसांच्या मुंबईचा हिंदी भाषिकांचे शहर म्हणून प्रवास सुरु झाला  आहे. तर याचा परिणाम हा लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच महापालिका निवडणुकीवरही होताना दिसला आहे. मराठीचा टक्का घसरल्याने शिवसेनेला भाजप वरचढ ठरत आहे. याबाबतचे चित्र गेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मराठी माणसाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. 
 
2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार मातृभाषेमध्ये हिंदी भाषिकांचा आकडा हा 40 टक्क्यांनी वाढला असून,  2001 मध्ये ही संख्या २५.८८ लाख इतकी मोजली गेली  होती, तर  तीच दहा वर्षांत 35.98 लाख झाली असून,  म्हणजे 10 वर्षांत तब्बल 10 लाख हिंदी भाषिकांची संख्या वाढली आहे.  मराठी भाषिकांमध्ये 2.64 टक्क्यांची घट नोंदविली गेली असून,  2001 मध्ये 45.23 लाख मराठी मातृभाषिक होते, तेच 2011 मध्ये 44.04 लाख झाले आहेत. मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि रायगडमध्येही लोकसंख्येतील हे बदल दिसून येतात. ठाणे, रायगडमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत तब्बल ८० टक्के वाढ झाली आहे.महाराष्ट्राच्या अन्य भागातून मुंबईला होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण १९६१ साली ४१.६ टक्के होते ते २००१ साली ३७.४ टक्के झाले. त्याचवेळी उत्तर प्रदेशातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण वाढले. १९६१ साली उत्तर प्रदेशातून मुंबईत १२ टक्के स्थलांतरीत येत होते तेच प्रमाण २००१ साली २४ टक्के झाले.
 
मराठी मातृभाषिकांची संख्या कमी झाली असली तरी आजही अन्य भाषिकांच्या तुलनेत मुंबईत मराठी मातृभाषिकांची संख्या जास्त आहे.  २००१ साली मराठी मातृभाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ४५.२४ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले. त्याच दशकभरात गुजराती भाषिकांची संख्या किंचित कमी झाली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे जे बोलत होते ते खरे आहे की काय असे ऐकून चित्र सध्या दिसून येते आहे.