testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बारावीचा गणिताचा पेपरही व्हॉट्स अॅपवर व्हायरल

पुन्हा एकदा बारावीचा पेपर फुटला आहे. याआधी मराठी, एस.पी. विषयांपाठोपाठ सोमवारी गणित विषयाचा पेपरही व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गणिताचा पेपर व्हायरल झाला.
याप्रकरणी वांद्रे येथील परीक्षा केंद्रातून एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान 2 मार्च रोजी मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसंच बारावीच्या इतर काही विद्यार्थ्यांची चौकशी सुरू झाली आहे.


यावर अधिक वाचा :