Widgets Magazine

ठाणे महापौरपदी मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठाणे महापौरपदाची निवडणूकीची औपचारिकता उरली आहे. मुंबईपाठोपाठ ठाण्याच्या महापौरपद निवडणूक भाजप लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे ठाणे भाजपचे अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले आहे. महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदासाठी रमाकांत मढवी यांनी अर्ज दाखल केला. भाजपकडून आशा सिंह आणि मुकेश मोकाशी यांनी भरलेला अर्ज मागे घेतला. महापौरपदासाठी राष्ट्रवादीनेही अर्ज भरला होता, मात्र भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीनेही माघार घेतली.


यावर अधिक वाचा :