गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई सोबत या तीन शहरात म्हाडाची लॉटरी हजारो घरे

सर्वसामान्य माणूस घराचं स्वप्न करण्यासाठी ज्या आशेवर असतो, त्या म्हाडाची लॉटरी लवकरच जाहीर करणार आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाची लॉटरी निघणार आहे. या लॉटरी मध्ये  मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादमधील घरांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाही होणार आहे.

यामुळे अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर हे घरे सामन्य लोकांना परवडणारी असून त्यामुळे हक्काचा निवारा मिळणार आहे.  आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकार म्हाडाची लॉटरी काढणार आहे. यामध्ये मुंबईतील 238 घरं , 107 गाळ्यांचा समावेश असेल. म्हाडा पुणे, नाशिक आणि औरंगाबादमधील घरांसाठीही लॉटरी काढणार आहे. पुण्यातील 4464, नाशकातील 1 हजार आणि औरंगाबादमधील 800 घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढली जाईल. त्यामुळे तुम्हला जर घर घ्यायचे असेल तेही माफक दरात आणि कोणतीही फसवणूक न होता तर तयार रहा आणि आतापासूनच तयारी करा तुमचाही क्रमांक या घरांसाठी लागू शकतो.