बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 विद्यार्थी ताब्यात

एका इंग्रजी शाळेतील मुलीला लैकिग शोषण आणि ब्लॅके मेलिंग करत तिच्यावर अत्याचार केले गेले आहे. सोशल मिडीयाचा वापर करत हा सर्व प्रकार घडला आहे. अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 5 अल्पवयीन आणि एका प्रोढास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सिह्स्थ नगर अंबड येथे एक प्रसिद्ध इंग्रजी माध्यमिक शाळा आहे. तर या शाळेतील सिनियर मुलांनी सोशल मिडीयाचा उपयोग करत हा लैकिक शोषण आणि बलात्कार केल्याचा प्रकार केला आहे. यामध्ये 10 वी आणि 11 वीतील असलेल्या आरोपी मुलांनी एकत्र येत व्हॉटस अॅप वर एक ग्रुप तयार केला आणि आपल्या सोबत शिकत असलेल्या मुलीना सुद्धा आय ग्रुपमध्ये सामावून घेतले होते. त्यामधील एका मुलीला त्यांनी भीती दाखवत तिला मुलीना या ग्रुप मध्ये बोलवण्यास सागितले होते. मग त्या मुलीने दबावात येत 7 ते 9 मुलीना ग्रुप मध्ये सामावून घेतले होते. मग काय या ग्रुप मध्ये अश्लील असे मेसेज पाठवणे मुलांनी सुरु केले.तर हे मेसेज घरी दाखवू अशी धमकी देत यातील मुलींचे लैंगिक शोषण सुरु केले होते. तर अनेक मुलींना शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडले गेले होते.
 
तर भयानक म्हणजे या ग्रुप मधील एका मुलीला दिवाळीच्या सुट्टीत मुलांनी एका ठिकणी बोलावून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला आहे. तर तीला तिचा मोबाईलनं इतर मुलांना देण्यास दबाव टाकत भाग पाडले होते. तर तिला अनेक मुलाचे अनेक घाण आणि अश्लील मेसेज टाकले होते. हे काही प्रकरण त्या मुलीच्या आईच्या लाक्षात आले होते. तेव्हा त्यांना धक्काच बसला, मेसेज आणि क्लिप्स आफुन त्या तर हादरल्या होत्या. तर मुलीस सोबत झालेला अत्याचारही त्यांना कळाला होता.त्या आईने हे प्रकरण शाळेत कळविले मात्र शाळेने उलट असे करू नका मुलांचे भविष्य खराब होईल असे टाकले मात्र पालकांनी काही न ऐकता पोलिसांना कळविले आणि तक्रार दाखल केली आहे. ज्या मुलीवत हा प्रसंग घडला ती इयत्ता आठवी वर्गात शिकत आहे.
 
या बाबतीत अंबड येथे आई पी सी  सेक्शन ३७६ आणि  Protection of Children from Sexual Offences Act 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामधील 6 मुलांना अटक केली असून 5 अल्पवयीन एक सज्ञान आहे. अजून या केस मधील अनेक मोठे खुलासे होणार असून प्राथमिक माहितीत अजून दोन मुली तक्रार करणार आहे. या प्रकरणाने शाळा आणि शहर पूर्ण हादरले असून मोबाईल आणि टॅबलेटचे चुकीचा उपयोग होतोय हे समोर आले आहे. या नामांकित शाळेने आधीच या सर्व बाबीकडे लक्ष दिले असते तर हे भयानक प्रकरण घडले नसते. तर आपले पाल्य काय करते कोणाशी बोलते हे पाहणे सुद्धा पालकांचे काम होते.