गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016 (14:32 IST)

MNSचे अल्टीमेटम- 48 तासात भारत सोडा पाकिस्तानी अॅक्टर

उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावात राज ठाकरे यांची पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने धमकी दिली आहे की सर्व पाकिस्तानी ऍक्टर आणि कलाकार 48 तासात भारत सोडा. असे झाले नाही तर मनसेचे म्हणणे आहे की ते भारतात राहत असलेले पाकिस्तानिंना स्वत: हात पकडून बाहेर करतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटांना रिलीज नाही होण्याची धमकी दिली आहे. यामुळे बर्‍याच चित्रपटांवर त्याचा प्रभाव पडणार आहे.  
 
बर्‍याच कलाकारांची मुष्किल वाढणार आहे  
मनसे चित्रपत सेनाचे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे की भारतात काम करत असलेले सर्व पाकिस्तानी कलाकारांनी लगेचच देश सोडायला पाहिजे. उरी अटॅक नंतर भारत पाकमध्ये तणाव वाढत आहे. या दहशतवादी हल्ल्यात 18 भारतीय सैनिक मरण पावले होते. भारत सरकारने उरी अटॅकसाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवले आहे. अशात मनसेचा हा ऍलन बॉलीवूडमध्ये भाग्य अजमावणारे पाकिस्तानी कलाकारांची मुष्किल वाढू शकते.  
 
'रईस' आणि 'ऐ दिल है मुश्किल'ला रिलीज नाही होऊ देणार  
MNS ने म्हटले आहे की 'रईस' आणि 'ऐ दिल है मुश्किल' मूव्हीला भारतात रिलीज होऊ देणार नाही, कारण दोन्ही चित्रपटांमध्ये  पाकिस्तानी कलाकार सामील आहे. 'ऐ दिल है मुश्किल' करण जौहरचे चित्रपट आहे आणि 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. यात  पाकिस्तानी अॅक्टर फवाद खान आणि इमरान अब्बासने काम केले आहे. जेव्हा की रईस शाहरुख खान अभिनित चित्रपट आहे जी पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात पाकिस्तानी एक्ट्रेस माहिरा खानने काम केले आहे.  
 
पहिले प्रकरण नाही  
हा काही पहिला मोका नाही आहे जेव्हा भारतात पाकिस्तानी कलाकारांना धमकी देण्यात आली आहे. या अगोदर शिव सेनाने गझल गायक गुलाम अली यांना मुंबईत आपला कार्यक्रम रद्द करण्यास मजबूर केले होते. भारत-पाकमध्ये टी-20 वर्ल्ड कपला घेऊन पक्षाने विरोध करण्याची धमकी दिली होती.