testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबई: बेस्ट कामगारांचा संप अखेर मागे

mumbai baest
Last Modified मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:40 IST)

मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला बेस्ट कामगारांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. संप मागे घेण्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि कामगार नेते शशांक राव यांची मध्यस्थीची भूमिका महत्वाची ठरली आहे. मातोश्रीवर झालेल्या चर्चेत बेस्ट कामगार कृती समितीने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. दुपारी साडे तीन वाजता मातोश्रीमध्ये झालेल्या बैठकीत बेस्ट कामगारांना १० तारखेपूर्वी वेतन मिळण्याबाबत, तसेच बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेत समाविष्ट करण्यावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान बेस्ट कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसेनेने स्विकारल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले.

याआधी

बेस्ट कामगारांच्या मागण्यांसाठी मॅरेथॉन चर्चा झाली. मातोश्रीवर सोमवारी दुपारी झालेल्या चर्चेनंतर बेस्ट कामगार कृती समितीने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.यावर अधिक वाचा :