गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुन्हा मुंबईत कोसळली इमारत, 4 मृत

collapse
मुंबईतील भेंडी बाजार परिसारत पुन्हा इमारत कोसळली आहे. यामध्ये चोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा आकडा वाढू शकतो.
 
पाच मजली इमारत  जे जे मार्ग परिसरात कोसळल्याची घटना  सकाळी घडली आहे. इमारतीच्या  ढिगाऱ्याखाली जवळपास ४० किंवा जास्त नागरीक अडकले आहेत असा अंदाज आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जोरदार मदतकार्य सुरु झालं आहे. महिती कळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अनके स्थानिक नागरिकांनी लगेच  बचावकार्य केलं आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्कालीन अर्थात एनडीआरएफचे ४५ जवान दाखल झाले आहेत. त्यांनी जेव्हा काम सुरु केले तेव्हा .१० मिनिटांत २ नागरिकांना त्यांनी  सुरक्षित बाहेर काढले आहे. या दुर्घटनेत 4 मृत झाले आहेत मात्र हा आकडा वाढू शकतो तर जवळपास २० पेक्षा अधिक जखमी आहेत. या सर्व नागरिकांवर जेजे येथे उपचार सुरु आहेत.