शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 17 जुलै 2024 (11:20 IST)

Mumbai Hit and Run: मिहीर शाहला 30 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी

jail
मुंबई वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला मिहीर शाहला मंगळवारी 14 दिवसांची  न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाह ला 9 जुलै रोजी अटक केली. त्याच्यावर बीएमडब्ल्यूने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला गाडीने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर मिहीर पळून गेला आणि 2 दिवसांनंतर पोलिसांच्या ताब्यात आला. 

मिहीर हा 24 वर्षांचा असून राजेश शाह यांचा मुलगा आहे. या अपघातानंतर राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली मात्र नंतर त्यांना जमीन मिळाला.
 
7 जुलै रोजी 'ॲनी बेझंट रोड वरळी' येथे बीएमडब्ल्यू कारने स्कूटरवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिल्याने हा अपघात झाला. ज्यामध्ये महिलेला स्कूटरसह 1.5 किलोमीटरपर्यंत ओढले गेले आणि यादरम्यान तिचा मृत्यू झाला. कावेरी नाखवा असे मृत महिलेचे नाव आहे. कारने स्कूटरला धडक दिली तेव्हा कावेरी पती प्रदीपसोबत होती. या रस्ता अपघातात जे जखमी झाले. 

कारने स्कूटरला धडक दिली तेव्हा मिहीर शाह कार चालवत होता आणि यावेळी त्यांचा ड्रायव्हर राजर्षी बिदावत शेजारच्या सीटवर बसला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मिहीरच्या वडिलांच्या सांगण्यावरून राजर्षी बिदावत सीट बदलून ड्रायव्हरच्या सीटवर आले. 

या घटनेनंतर मिहीर शाहने पोलिसांपासून वाचण्यासाठी दाढी कापली आणि पूर्णपणे वेश धारण करून पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न सुरू केला. एवढे सगळे करून देखील पोलिसांनी 9 जुलै रोजी त्याला अटक केली. तो तपास कार्यात सहभाग देत नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. न्यायालयाने त्याला 30 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
Edited by - Priya Dixit