testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

10 वर्षांच्या लढ्यानंतर बीएमसीतील 2 हजार 700 कंत्राटी सफाई कामगार सेवेत कायम

mumbai nagarpalika
Last Updated: सोमवार, 10 एप्रिल 2017 (11:05 IST)
मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना 10 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर महापालिकेतील 2 हजार 700 कंत्राटी सफाई कामगारांना सुप्रीम कोर्टाने सेवेत कायम करण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर सर्व सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाणार आहे. तसेच त्यांना 2014 पासूनचा वेतन फरकही महापालिकेकडून मिळणार आहे. कामगार कायद्यानुसार कंत्राटी कामगारांचे सलग 240 दिवस भरल्यानंतर त्याला सेवेत कायम करावं लागतं. परंतु महापालिकेने तसं न केल्याने कचरा वाहतूक श्रमिक संघाने कामगार लवादाकडे न्याय मागितला होता. कामगार लवादाबरोबरच हायकोर्टानेही कामगारांच्या बाजूने न्याय दिला असतानाही याविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात गेली होती.


यावर अधिक वाचा :