बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्याचा अर्थसंकल्प सादर

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटिवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांची घोषणाबाजी, गोंधळ अशा वातावरणातच  अर्थसंकल्प सादर झाला. सुमारे दोन तास चाललेल्या भाषणामध्ये मुनगंटिवार यांनी राज्यासाठी विविध घोषणा जाहीर केल्या. 
 
अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी :
 
विमानतळ
 
शिर्डी विमानतळाचा विकास लवकरात लवकर करण्याचा मानस
शिर्डी साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत,  शिर्डी विमानतळ लवकरच करणार, अमरावती, शिर्डी अशा विमानतळासाठी 50 कोटी
बंदर क्षेत्राच्या विकासासाठी 70 कोटींची तरतूद
नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणार
नवी मुंबई विमानतळ लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील
कर
कुठलीही करवाढ नाही
4511 कोटी महसूल तूट येत आहे
 
कामगार
 
राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित श्रेणी देता यावी यासाठी अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापनाकेंद्राच्या धर्तीवर राज्य शासन आता भांडवली खर्चावर लक्ष केंद्रीत करणार, त्यामुळे प्रत्येक विभाग त्यांची तरतूद स्वतंत्रपणे वापरु शकेल.
 
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मानस
 
सुरक्षा
 
पोलिस, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडसाठी एकच नंबर – ‘डायल 112’
 
पोलीस गृहनिर्माणासाठी 325 कोटींचा निधी
 
रस्ते अपघात रोखण्यासाठी 34 कोटी 86 लाख निधी
 
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, अमरावती, चंद्रपूरमध्ये सीसीटीव्ही बसवणार
 
डिजिटल महाराष्ट्र
 
प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी, ई तंत्रज्ञानाच्या वापरास माहिती तंत्रज्ञानाला 200 कोटींचा निधी
 
सार्वजनिक वितरण व्यवस्था कॅशलेस केली जाणार
 
2018 पर्यंत 28 हजार ग्राम पंचायती डिजिटल करणार
 
स्मारके
 
शिवाजी महाराज स्मारक- अरबी समुद्र , शाहू महाराज – कोल्हापूर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर – इंदू मिल, दादर – बाळासाहेब ठाकरे – मुंबई ; सर्व स्मारकांसाठी 200 कोटी
 
पर्यटन
 
सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त 25 कोटी तसंच पर्यटनालाचालना देण्यासाठी विविध सुविधांसाठी 100 कोटीपर्यटन स्थानच्या विकासासाठी 174 कोटी
 
आषाढी एकादशी पंढरपूरवारी या अर्थसंकल्पसून 3 कोटी निधी
 
निर्मल वारीसाठी मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांसाठी 100 कोटींची विशेष तरतूदसार्वजनिक वितरण व्यवस्था कॅशलेस केली जाणार
 
गांधींजी – सेवाग्रामच्या वास्तव्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत – सेवाग्राम विकासाठी 266.53 लाख रुपयाचा सेवाग्राम आराखडा होता त्यासाठी 93.80 लाखची तरतूद
 
महिला
 
महिला आयोगाला 7 कोटी 94 लाख, अंगणवाडी बालकांना जेवणासाठी 310 कोटी, महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाख रुपये
 
शालेय विद्यार्थिंनींना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी योजना
 
कुपोषणा संदर्भातील भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वाढवत गरोदर व स्तनदा माता तसेच बालके यांच्या पोषण आहारात वाढ
 
अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय
 
स्वतंत्र ओबीसी महामंडळासाठी 2 हजार 384 कोटींची तरतूद
 
अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 7 हजार 231 कोटी रु. निधीची तरतूद.
 
चंद्रपूर येथील दिक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करणार
 
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ 200 कोटी, शामराव पेजे कुणबी विकास 200 कोटी अल्पसंख्यांक 332 कोटी
 
राज्यातील अल्पसंख्याकबहुल क्षेत्रात नागरी सुविधांसाठी – १२५ कोटी
 
पर्यावरण
 
पेंच, नागझिरा, नवेगाव अशा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी 80 कोटी तरतूद
 
वन्य प्राण्यांचा पिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी योजना: 25 कोटींची तरतूद , गावागावातील पर्यावरण विषयक योजनांसाठी- 20 कोटी, वन वणवे – चंद्रपूरात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण – 5 कोटी
मानव वन्य जीव संघर्ष कमी करण्यासाठी अभयारण्यातून स्वखुशीने स्थलांतरीत होणा-या लोकांसाठी जमीन मोबदला बाजारभावाच्या 4 पट देण्याचा निर्णय, त्यासाठी 45 कोटी रु. निधीची तरतूद
 
गेल्यावर्षीच्या विक्रमी वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेत सातत्य ठेवण्याचा निर्धार, पुढील 3 वर्षामध्ये 50 कोटी वृक्षारोपण करण्याचे नियोजन, सन 2017 मध्ये 4 कोटी, सन 2018 मध्ये 13 कोटी व सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करणार
 
नदी विकास
 
नद्यांच्या शुद्धीकरणाचं काम प्राधान्याने हाती घेणार
 
मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी 990 कोटी 26 लाखांची तरतूद
 
केंद्राकडून 100 कोटी अर्थसहाय्य अपेक्षित आहे
 
आरोग्य
 
मेडिकल कॉलेज इमारत बांधणीसाठी 559 कोटींची तरतूद
 
औरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार – 126 कोटी
 
कर्करोग – तीन प्रकारच्या कर्करोगांचे निदान व्हावे यासाठी – अद्ययावत यंत्रणा स्थापन होईल – 43 कोटी
 
सिटी स्कॅन मशीन 31 रुग्णालयात मिळणार – त्यासाठी 77 कोटी 50 लाख 1316 कोटी – महात्मा फुले जीवनदायी योजना
 
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान – 211 कोटी
 
साथरोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार, केंद्र शासनाच्या अटल मिशन फॉर रिज्यूवेशन व अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) योजनेसाठी 1 हजार 870 कोटी रु. निधीची तरतूद
 
स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि मुखकर्करोगांच्या ‍निदानासाठी 253 शासकीय आरोग्य संस्थामध्ये मॅमोग्राफी मशीन, कोल्पोस्कोप व व्हेलस्कोप मशीन उपलब्ध करणार